You are currently viewing कॅमेर्‍यासोबतचं…माझं जगणं..!

कॅमेर्‍यासोबतचं…माझं जगणं..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य बाबा कवी ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कॅमेर्‍यासोबतचं…माझं जगणं..!*

 

काठावरचं गणित चुकलं

प्रेम झाडांवरं उगवलं

नयन कॅमेर्‍याचे जादुगार

लावण्य ईश्वराचं जपलं..!

 

छंदाला उदरनिर्वाहाचं साधन

चिरागदीनला.. जमलं नाही

कॅम-यापुढेचं उभा राहिलो

व्यक्तीमत्वात ..तडजोड नाही..

 

रेडीमेड शुभेच्छावस्त्रांचा बस्ता

सदैव डबलबूलचा होता

कॅमे-याचा बिनशर्ट पाठींबा

अकबरअलीजनं… दिला होता..!

 

उसन्या फोटोंची दिपमाळ

कॅमेर्‍यानेचं हायलाईट केली

सुरक्षित कोषांत राहण्यानं

प्रगती काहिशी खुंटली..,!

 

जे आहे त्यातचं

कॅमेर्‍याने सुखीसमाधानी ठेवलं

स्वप्ने होती….नाही असं नाही

नशीबानेचं तिकिटं कापलं…!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

Double Bull!Chirag Din

Akbarallis..Brands..

प्रतिक्रिया व्यक्त करा