कसाल राणेवाडी येथे १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव*
सिंधुदुर्ग
कसाल राणेवाडी येथे १४ डिसेंबर रोजी सिद्धी गोसावी महापुरुष स्थळ येथे दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे . यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० ते १२ श्रींची पूजा व अभिषेक दुपारी १२.३० ते ४.३० महाप्रसाद सायं ५.३० ते ६.३० श्रींची महाआरती संध्या ७ वा. हरिपाठ (ह. भ. प. माऊली महाराज बबन सावंत कसाल वारकरी संप्रदाय यांचे हरिपाठ)रात्री ९ वा. स्थानिक सुश्राव्य भजनेकार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन दत्त जयंती उत्सव मंडळ राणेवाडी यांनी केले आहे.