दीपक केसरकर विज्ञान महाविद्यालयात जागतिक एड्स दिना निमित्त जनजागृती….
दोडामार्ग
आमदार दीपक केसरकर विज्ञान महाविद्यालयात जागतिक एड्स दिनाच्या पाश्र्वभूमीवर जनजागृती करण्यात आली
संपूर्ण जगभरात गंभीररीत्या फोफावत असलेल्या या आजाराबद्दल जनजागृती व्हावी.विद्यार्थ्यांच्या मनात असलेले एड्स या आजाराबद्दल चे समज व गैरसमज दूर होण्यासाठी महाविद्यालयामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. ए. एस. सिनारी यांनी ‘ एड्स : कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर लोकांमध्ये एड्स या आजाराविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने विद्यार्थी व शिक्षक यांनी एड्स विरोधी घोषणा देत आसपासच्या लोकवस्तीमधून जनजागृती फेरी काढण्यात आली.
या कार्यक्रमावेळी रसायनशास्त्र विभाग श्री. एन.एम. चौगले, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. मोरे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्था व प्राचार्य श्री. एम. व्ही. गोळसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.