*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ऋतु हिवाळा*
आलाच आहेस तर थांबून जा
तनमनाला गारवा देऊन जा
नको करू उतमात उतावळेपणा
पावसासारखा
थोडा थंडीत कडकडीत मिठी मारून जा
तो पाऊस कसा देऊन जातो
हिरवा गालीचा
तसा तू ही त्या गालीच्यावर
दवबिंदूंनी टवटवी देऊन जा
कुठे धुक्याची झालर
तर कुठे बर्फाची चादर आंथरून जा
तुझ्या गारठ्याला सहन करण्याची
शक्ती देऊन जा
पुढे उन्हात आम्ही होरपळणारच आहे
आज आम्हाला गारव्याचा
सुखद आनंद देऊन जा
हिरवागार गारेगार
ऋतू हिवाळा
तू आलाच आहेस तर
थोडे थांबून जा. ….
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार* *चांदवडकर, धुळे.*
7588318543.