*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मी पुन्हा येईन*
मी पुन्हा येईन
असे देवेंद्र गरजले
संयमी स्वभावाने
महाराष्ट्राला जिंकले
विरोधक खूपच
उडवत होते टिंगल
देवेंद्रजींपुढे शून्य
विरोधकांची अक्कल
हसून उत्तर दिले
कधी नाही केला राग
वादळही शांत होईल
असा स्वभावाचा भाग
किती आले किती गेले
पण देवेंद्रजीच जिंकले
मी पुन्हा येईन हे वाक्य
त्यांनी अजरामर केले
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक