मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेने महिला सक्षमीकरण धोरणांतर्गत एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील महिलांना आर्थिक लाभ होणार आहे.
शिव उद्योग संघटनेने ‘इंदिश्रेष्ठ शास्त्रम् आयुर्वेदिक हेअर ऑईल’ आणि ‘स्टे फाईन मल्टि व्हेंचर’ या दोन कंपन्यांसोबत करार केला आहे. या करारांतर्गत घरोघरी तसेच समाज माध्यमांद्वारे विक्रीतून महिलांना आर्थिक लाभ होणार आहे.
शिव उद्योग संघटनेच्या महिला रोजगार समिती व मार्केटिंग समिती या दोन्ही समित्या हा उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अतिशय उत्तम प्रकारे आर्थिक फायदा होणार असून या उपक्रमात काम करण्याची इच्छा असेल तर कृपया 9702058930 या संपर्क क्रमांकावर व्हॉटस्ॲप द्वारे आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक पाठवावा. शिव उद्योग संघटनेच्या मार्केटिंग समितीचे सदस्य आपणास या विषयाची पूर्ण माहिती देतील.
सदर उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे आणि शिव उद्योग संघटनेच्या महिला रोजगार समिती, मार्केटिंग समितीचे सदस्य आणि विविध जिल्ह्यातील पदाधिकारी या उपक्रमाच्या यशासाठी कठोर परिश्रम करत आहेत.