You are currently viewing ऐका गोष्ट बाराची

ऐका गोष्ट बाराची

*ऐका गोष्ट बाराची*

*12/12/12/12/12*

*बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक…*

*मोजण्यासाठी द्वादशमान*
*पध्दती…१२ची*

*फूट म्हणजे १२ इंच*

*एक डझन म्हणजे १२ नग.*

*वर्षाचे महिने १२,*

*नवग्रहांच्या राशी १२*

*गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात….१२ वे*

*तप….१२ वर्षाचे,*

*गुरुगृही अध्ययन….१२ वर्षे*

*घड्याळात आकडे…..१२,*

*दिवसाचे तास …..१२,*

*रात्रीचे तास …..१२ ,*

*मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२*

*मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२*

*एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले….१२*

*सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..*

*पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..*

*इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग*

*बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते*

*मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..*
*बलुतेदार,बारभाई,बारावाटा…सगळे १२,*

*बेरकी माणूस म्हणजे*
*१२ गावचं पाणी प्यायलेला*

*तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.*

*ज्योतिर्लिंग…..१२ आहेत,*

*कृष्ण जन्म….रात्री १२*

*राम जन्म दुपारी…१२ ,*

*मराठी भाषेत स्वर…१२*

*त्याला म्हणतात…बाराखडी*

*१२ गावचा मुखीया,*

*जमिनीचा उतारा ७/१२चा*

*इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश*

*खायापिया कुछ नही,* *गिलास फोडा बाराना*

*बारडोलीचा सत्याग्रह*

*पळून गेला ——पो’बारा’*

*पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’*

*एक गाव, १२ भानगडी*

*लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती*

*अशी आहे ही १२ चीं किमया….*

*शरद पवारांचा जन्म.. १२/१२*

*त्यांचे गांव…… बारामती*

*आणि*

*सर्वात महत्त्वाचे…*

*MH12 अर्थात ……पुणे☺️*
*असे भन्नाट शोध फक्त आणि फक्त* *पुणेकर लावू शकतात*
*राज्यपालांनी लटकवून ठेवलेल्या आमदारांची संख्या = 12*
*आता सस्पेंड झालेले आमदारांची संख्या = 12* 🤔😲😀😄🤪🙄😅
*काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण 12 😂*

 

: कोणालाच *दोष* देऊन
उपयोग नाही…

महिनाच *”बाराचा”* आहे…

😂😂😂
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*✒️✒️✒️✒️✒️✒️

प्रतिक्रिया व्यक्त करा