एशियन थाई बाॅक्सींग स्पर्धेत संस्कार राणे यास सुवर्णपदक
देवगड
गोवा येथे नुकत्याच झालेल्या एशियन थाई बाॅक्सींग स्पर्धेत देवगड तालुक्यातील पोयरे गावातील संस्कार राकेश राणे ( ५ वर्षे) यांने रौप्यपदक पटकावित भारतीय संघाची मान उंचावली आहे.
या स्पर्धेत खुल्या गटात वेंगुर्ले येथील मारीया आल्मेडा हिने सुवर्णपदक पटकावले. तसेच जि.प. प्राथमिक शाळा ओरस येथील खेळाडू हरेंब नार्वेकर व पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली येथील खेळाडू संस्कार राणे यांनी रौप्यपदक पटकावले.
या आशियाई स्पर्धेत भारत, भूतान,नेपाळ, कंबोडिया,श्रीलंका,व्हिएतनाम इतर देश सहभागी झाले होते.
संस्कार राणे यांस सिंधुदुर्गाचे अध्यक्ष लेफ्टनंट विवेक राणे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्कारने या लहान वयात मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे आई-वडीलांनी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.