*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नको खाऊ तू इतला भाव….*
कोनतं से तुनं सांग व गांव
एकडाव सांगीटाक तुनं ते नांव
पिरिमम्हा तुना मी पडीच गऊ ना नको तू साधू
आते डावं….
एकडाव सांगीटाक तुनं ते नाव..
कोनतं से तुनं सांग व गांव….
भलती आवडंस माले तू मैना
एकडाव दखी ले जरासा ऐना
तुन्या पायना छुमछुम पायल
मना हुई ग्या ना जीव तो घायंल
कसं मी सांगू तुले व मैना तुना वधारी ग्या
भलता भावं….
कोनतं से तुनं सांग व गांव…
एक डाव सांगीटाक तुनं ते नाव…
जशी दिसंस चवयीनी शेंग
तुना मांगे ती पोरेसनी रांग
नागीन चालस उडे फफूटा
तुना ज्वानीना हुई ग्या बोभाटा
रंभा उर्वशी पडन्यात फिक्या तुनी चावय से
गावोगाव…
कोनतं से तुनं सांग व गांव
एकडाव सांगीटाक तुनं ते नांव….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)