*साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव तथा मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*डोळे पाणावले*
तुझी आठवण येता
नकळत डोळे पाणावले
जगलेले मधुर क्षण
अलगद मनास आठवले….१
अंतःस्थ कोंडल्या हुंदक्याने
सर आसवांची ओघळली
शहारल्या तुझ्या स्पर्शातून
ओढ प्रीतीत गवसली….२
विरह नकळत वाढता
दाहकता मज जाणवली
दुराव्यातला तुझा अबोला
कळ उरात लपवली…३
सुख सोबतीचे आठवताना
पेटतात डोळ्यात ज्योती
भाव मनामध्ये दाटताना
गात्रगात्र पुलकीत होती….४
संकट काळी वादळातही
नेटाने बरोबर थांबली
श्वासातल्या मिलनाची
गाठ तुझ्याशी बांधली….५
तेजाळल्या चंद्राची साक्ष
पुनवेच्या चंदेरी नभाला
उगवत्या रविराजची साथ
सोनपावली केशरी प्रभाला..६
सौ. स्नेहा धोंडू नरिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग