फोंडाघाट ग्रामपंचायतीला अग्निशामक बंब द्यावा…
आमदार नितेशजी राणे यांचे कडे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी करणार मागणी.
फोंडाघाट
फोंडाघाट ग्रामपंचायतीला अग्निशामक बंब द्यावा, आमदार नितेशजी राणे यांचे कडे मागणी करण्यात येणार आहे. फोंडाघाट असलेने अत्यावश्यक सेवा म्हणुन या ठिकाणी अग्निशामक बंब असावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. काल घाटात लागलेली ट्रकला लागलेली आग कणकवली वेंगुर्ला याठिकाणाहुन आलेले बंब याचा विचार करता फोंडाघाटमध्ये बंब असावा या साठी आमदाराना निवेदन देण्यात येणार आहे. आमदार नितेश राणे नक्कीच विचार करतील असा विश्वास नाडकर्णी यांनी व्यक्त केला.
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*