You are currently viewing सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधन आरोग्य शिक्षण समाजसेवा देश संरक्षण परिषद सरकारी सेवा समाज प्रबोधन परिषद अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय मसुरकर हे होते तर प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती कुडाळ श्री श्याम चव्हाण विस्तार अधिकारी श्री कोरोस्कर समाज कल्याण अधिकारी श्री ठाकूर तसेच सह्याद्री फाउंडेशन संचालक एडवोकेट रूपाली पाटील जीवदान विशेष शाळा झारा संस्नेहा परब व डॉक्टर मातृत्व आधार फाउंडेशन संस्था मालवण सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री संतोष लडबेवर उपाध्यक्ष श्री दादा वेंगुर्लेकर जिल्ह्याभरातील दिव्यांग प्रतिनिधी व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री सुनील सुभानजी सावंत एकता दिव्यांग संस्था व साहस प्रतिष्ठान संस्थेत काम करत दिव्यांगांचा विकास साधून समस्या सोडवणे म्हणून त्यांना जिल्हास्तरीय कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सौ उर्मिला उदय चव्हाण काळसे पंचक्रोशी दिव्यांग सेवा संस्था येथे कार्यरत असून दिव्यांगांच्या समस्या सोडवणे मार्गदर्शन करणे त्यांचा विकास करणे यासाठी त्या सतत धडपडत असतात म्हणून त्यांना जिल्हास्तरीय कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री महेंद्र आबा मोडक भजन सेवेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत दिव्यांगाप्रती असता प्रेम व सकारात्मकतेने त्यांच्या समस्या सोडवण्याचं महत्त्वपूर्ण काम करतात म्हणून त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट भजनी कलाकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री गजानन सदाशिव तेंडुलकर लष्करी सेवेतील सेवानिवृत्त असून सध्या क्रिकेट कोच सावंतवाडी येथे मार्गदर्शन करण्याचं कार्य करत असतात नवोदित खेळाडूंना घडवण्यात व त्यांना आर्थिक मदत करणं दिव्यांग बांधवांना मदत करणे हे त्यांचे ध्येय आहे म्हणून त्यांना उत्कृष्ट खेळाडू मार्गदर्शक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री राजेंद्र सखाराम कदम मैत्रेय दिव्यांग संघटना वैभववाडी या संस्थेमध्ये काम करत दिव्यांगांचा विकास करणे मदत करणे त्यांना मार्गदर्शन करणे हे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्यामुळे जिल्हास्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सौ जानवी उमाजी परब स्वतःची बायपास सर्जरी झालेली असताना सुद्धा आपल्या दिव्यांग पाल्याला शिकवण्याची जबाबदारी सांभाळत आहेत त्याचबरोबर दिव्यांग मुलांना एक दिशा दाखवण्याचे कार्य करत असल्याबद्दल जिल्हास्तरीय दिव्यांग पालक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले श्री मारुती जनार्दन गोसावी हे शिक्षक असून दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात त्यांना असलेले सेवा सुविधा शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करतात म्हणून त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सौ रुकसाना इरफान सारंग अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत असून दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण व सामाजिक आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचं काम करतात म्हणून त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार देण्यात आला श्री गणेश सुखदेव कायम दे हे स्वतः दिव्यांग असून बॅग बनवण्याचा व्यवसाय करतात म्हणून त्यांना जिल्हास्तरीय यशस्वी उद्योजक पुरस्कार देण्यात आला सौ श्रद्धा विप्रदास कदम माऊली महिला मंडळ संचलित कर्णबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळा चालवतात स्वतःच्या जागेवर दहा मुले सांभाळण्याची त्यांची इच्छा आहे म्हणून त्यांना जिल्हास्तरीय दिव्यांग महिला अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री शिवाजी महादेव घोगळे, जिल्ह्यातील ट्रक टेम्पो चालक यांच्या संघटना निर्माण करून त्यांना सेवा सुविधा देण्याचा महत्त्वपूर्ण काम करतात देशपातळीवरील संस्थेचे ते संचालक म्हणून काम करतात त्यांच्या या समाजकार्याबद्दल जिल्हास्तरीय कृतज्ञता पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले श्रीमती अर्चना मधुकर तांबेकर या अंगणवाडी सेविका पदावर कार्यरत असून दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे तसेच विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी घडवणे असे महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरीय उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले श्री अनिल आप्पा कदम हे शासकीय सेवेत असून दिव्यांगांना शासकीय सेवेत येणाऱ्या अडचणीच्या काळात मदत करतात म्हणून त्यांना सरकारी क्षेत्रातील जिल्हास्तरीय दिव्यांग कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री गोपाळ सहदेव चौकेकर हे सरपंच या पदावर कार्यरत असून गावचे प्रथम नागरिक या नात्याने दिव्यांगांच्या सेवा सुविधा व प्रश्न सोडवतात दिव्यांगांचा निरंतर विकास हवा हे त्यांचे ध्येय आहे म्हणून त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री प्रशांत प्रभाकर धोंड सेवानिवृत्त शिक्षक असून संगीत कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात दिव्यांगांसाठी मदत करतात म्हणून त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट कीर्तनकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री आनंद राजाराम ठाकूर बुद्रुक गावचे सरपंच असून गेली पंधरा वर्षाच्या काळात त्यांनी केलेले समाजकार्य अंध अपंग कर्ज यांना केलेली मदत ही उल्लेखनीय आहे म्हणून त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुहासिनी बाबुराव खरवते या अंगणवाडी सेविका असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवून मार्गदर्शन करतात भावी पिढी घडवण्याकडे त्यांचा असलेल्या लक्ष व दिव्यांगांचा विकास हवा हे त्यांचे ध्येय पाहता त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार देऊ गौरविण्यात आले श्री विठ्ठल अमृत गावडे हे आरोग्य सेवक या पदावर कार्यरत असून दिव्यांगांना नेहमीच मदत करतात दिव्यांगांचा सर्वांगीण विकास व्हावा हे त्यांचा ध्येय आहे म्हणून त्यांना जिल्हास्तरीय आरोग्य सेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्रीकृष्ण मोहन पांग हे स्वतःचे गणेश शाळा चालवतात त्याचबरोबर भजनाच्या माध्यमातून सामाजिक एकता समाज प्रबोधनपर कार्य करतात म्हणून त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट कलाकार पुरस्कार देण्यात आला श्रीरामदास वासुदेव नाईक हे दिव्यांग असून गायन वादन कलेत पारंगत आहेत दिव्यांगांसाठी असणारे प्रेम व करत असणारी मदत याचा विचार करत जिल्हास्तरीय उत्कृष्ट कलाकार पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले सर्व संगीता चंद्रकांत पाटील ग्रामसेवक पदावर कार्यरत असून दिव्यांगांना सामाजिक आर्थिक मानसिक स्तरावर विकसित करण्याचे त्यांचे ध्येय आहे या महान कार्याचा गौरव म्हणून जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले सर्व सीमा रमेश मयेकर शासकीय सेवेत काम करत असून दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने द्या सोडवतात दिव्यांगांचा निरंतर विकास व्हावा हे त्यांचे ध्येय आहे म्हणून त्यांना जिल्हास्तरीय आदर्श दिव्यांग कर्मचारी पुरस्कार देण्यात आला सौ रेखाताई गायकवाड माऊली कर्णबधिर विद्यालय दांडेली या शिक्षण संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत आणि दिव्यांगाप्रती असणारे आपुलकी प्रेमाची भावना तसेच त्यांच्या विकासासाठी असणारी धडपड पाहतात त्यांना जिल्हास्तरीय सिंदूरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले डॉक्टर सदाशिव राऊळ सेवानिवृत्त डॉक्टर असून समाजातील दिव्यांग गरजवंत लोकांची कामे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून करतात समाजसेवेचे हेरत हाती घेत दिव्यांगांचा केलेल्या विकास म्हणून त्यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री सुनील गणपत तांबे यांनी दिव्यांगांसाठी केलेले कार्य तसेच स्वतःचे प्राथमिक व्यवसाय सांभाळत समाजाप्रती दाखविलेल्या स्नेहभाव आदर याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री प्रशांत राजाराम कदम हे स्वतः दिव्यांग असून गेली 25 वर्षे ते व्यावसायिक आहेत म्हणून त्यांची ओळख आहे तसेच दिव्यांगांना व्यवसायामध्ये मदत करतात म्हणून त्यांना जिल्हास्तरीय यशस्वी उद्योजक पुरस्कार देण्यात आला श्री प्रकाश तुकाराम वाघ हे नावाजलेले गायक वादक असून या कलाते जोपासत आहे त्याचबरोबर दिव्यांगांसाठी सुद्धा मदत करतात म्हणून त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट कलाकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सौ. प्रसन्ना परेश शिर्के सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेमध्ये दिव्यांगांसाठी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करतात ऑनलाईन सेवा तसेच ही संस्था मोठी करून दिव्यांगांचा विकास करणे हे त्यांचे ध्येय आहे म्हणून त्यांना जिल्हास्तरीय सिंदूरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री शैलेश विनायक नारकर हे व्यावसायिक असून दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी मदत करतात म्हणून त्यांना जिल्हास्तरीय यशस्वी उद्योजक पुरस्कार देण्यात आला श्री शरद लाडू पाटयेकर काव्य लेखन नाट्य लेखन आपल्या लेखणीच्या माध्यमातून मानव मात्रेला एक प्रगतीची दिशा दाखवतात तसेच या संस्थेचे सल्लागार म्हणून त्यांना जिल्हास्तरीय सिंदूरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री विजय अंकुश मसूरकर हे शिक्षक ते केंद्रप्रमुख हा त्यांचा शासकीय सेवेतील काळ होता स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अंतर्गत पोलीस मित्र संघटना जिल्हा कार्याध्यक्ष आहेत स्वतःच्या दिव्यांग मुलाचे संगोपन चांगल्या पद्धतीने करतात तसेच समाजातील दिव्यांगांना सर्वतोपरी मदत करतात म्हणून त्यांना जिल्हास्तरीय दिव्यांग पालक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांनी आपल्या भाषणातून दिव्यांग करत असलेल्या कार्याचा गौरव केला व आपल्याकडून दिव्यांग यांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशा आश्वासन दिले सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी आपल्या भाषणातून पंचायत समिती कडे येणाऱ्या दिव्यांगांसाठी सेवा सुविधा आपण सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न करणार दिव्यांगांसाठी आपण सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही दिली समाज कल्याण अधिकारी श्री ठाकूर यांनी आपल्या भाषणातून दिव्यांग व्यक्तींना जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या सर्व सेवा सुविधा तसेच इतर मदत सुद्धा केली जाईल सेवानिवृत्तीनंतर आपण हेच काम हाती घेणार असल्याचे सांगितले अध्यक्षीय भाषणातून विजय मसुरकर यांनी दिव्यांग बांधव जे कार्य करतात ते उल्लेखनीय आहे असेच कार्य त्यांच्या हातून होत राहो त्यांचे उत्तर उत्तर प्रगती हो आणि आपणही त्यांच्यासोबत आहोत आपण सर्वतोपरी दिव्यांगांसाठी मदत करू. असे सांगितले पोलीस मित्र संघटना सिंधुदुर्ग च्या अध्यक्षा डॉक्टर सौ स्वाती मसुरकर याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेने पंचक्रोशी मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केलेल्या होत ्या यामध्ये निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी गोविंद चव्हाण तृतीय क्रमांक नेहा महेंद्र पवार तृतीय क्रमांक आर्या गुरुदास कसालकर हिने मिळवला तर चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक धनश्री राजीव मोडक द्वितीय क्रमांक प्रांजल दशरथ सावंत तृतीय क्रमांक पवन सदाबीज प्रजापती यांनी मिळवला यांना सुद्धा पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री राजेंद्र मेस्त्री, सौ प्रसन्ना शिर्के सौ गावडे सौ कासले श्री चव्हाण यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री दयानंद गावकऱ केले

प्रतिक्रिया व्यक्त करा