*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*
*सर्व भाषांच्या पलिकडल्या मनांतरातील भावनां !*
***************************
सर्वत्र इथून तिथुन सारी निसर्गसृष्टि , सारी पंचमहाभूते त्यांचा आविष्कार , सारे जग , सारी माणसं , साऱ्या सुख संवेदना , सारी स्थित्यंतरे , सारं सारं सारखं असलं तरीही मानवी मनातील वैचारीकता मात्र भिन्न भिन्न दिसून येते ..!
मानवी मनामद्धये असणारे अपेक्षित आत्मिक समाधान देणारे प्रेमास्थेच्या भावनांचे रूप मात्र एकच असते.!
तिथे फक्त *एक आत्मिक सुखानंद परस्पर प्रेमभाव अपेक्षित असतो.*
काल अचानक *एक परदेशी अबुधाबी येथील मन्सूर खान नावाचे अनोळखी व्यक्तिमत्व बोटनिकल गार्डन बंगलोर येथे सहजच मला भेटले .*
त्यांच्या स्मितहास्या मुळे मी अगदी सहज आकर्षून गेलो. पटकन हाय , हॅलो म्हणावे तर भाषेची अनभिज्ञता होती. कुठल्या भाषेत बोलायचे हाच मोठा प्रश्न होता.
त्यांना फक्त त्यांचीच भाषा येत होती . आमचे एकमेकांचे संभाषण तसे कुणालाच कळणारच नव्हते. पण आम्हा उभयतांच्या चेहऱ्यावरील भाव आणी डोळ्यातील अव्यक्त असलेले मनभावनांचे रूप , अंतरातील ओढ , मु्कशब्द सारं काही सांगत होते. चेहरे बोलत होते. एकमेकांच्या निर्मळ हस्तांदलनातून झालेला स्पर्श देखील अनेक जन्मांची ओळख परस्परांना सांगून गेला होता.!
*दैवयोग कसा असतो पहा…!*
योगायोगाने अगदी सहज एक ट्रांसलेटर भेटला तो त्यांच्या टुरिस्ट गाडीचाच भारतातलाच ड्रायव्हर होता. त्याने आम्हा उभयतांच्यात दुभाषी म्हणून सहकार्य केले . त्यामुळे आमचे संभाषण होऊ शकले ..परिचय देखील झाला ……
एक अनभिज्ञ व्यक्ती पण किती आस्था ! किती प्रेम आणि भावुकता किती मृदुलता ! किती नम्रता ! लाघवी व्यक्तिमत्व ! त्यांच्या नजरेतुन जाणवत होते. हे शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यांचे वय 60 माझे वय 75 तरीही दिलखुलास बोलणे झाले . त्यांचा कौटुंबिक परिचयही झाला.
विशेष म्हणजे एका तासा दोन तासाच्या प्रवासात झालेल्या या पहिल्या भेटितच त्यांनी आम्हा कुटुंबाला ते *बेंगलोरला ज्या हॉटेल ताज एक्झयुकेटिव्ह येथे उतरले होते त्या ठिकाणी (दावत) जेवणाचेही निमंत्रण दिले ..!*
हे त्यांच्या मनाचे मोठ्ठेपण होते…!
हे एक आश्चर्य होते….!
माझ्याबरोबर माझा 6 वर्षाचा नातू होता. त्याला त्यांनी प्रेमाने कडेवर उचलुन घेतले आणि कवटाळले. त्याक्षणी त्यांच्या चेऱ्यावरचे ते निष्पाप प्रसन्नतेचे भाव मलाही अंतर्मुख करून गेले.
माझ्या नातवाला नको ,नको म्हणत असताही देखील रु .१०००/- हातात दिले देखील.
*मन्सूर खान ही परदेशी अबुधाबीची व्यक्ती की ज्यांचा जीवनात कधीच कुठलाही सुतराम संबंध नाही अशी अनभिज्ञ व्यक्ती अचानक भेटते काय आणि ‘” आणि क्षणार्धात अनेक जन्मांचे नाते असल्यासारखी वागते काय ? याचे माला खुपच आश्चर्य वाटले.*
आम्ही त्यांच्या हॉटेलवर त्या कुटुंबाला भेटलो आणि नंतर मी देखील
त्यांना बेंगलोर मधील माझे घरी येण्याचे निमंत्रण दिले ..!
ते आले देखील..
*शेवटी मी हे आपले पूर्वजन्मिचेच ऋणानुबंध आहेत असे वर दाखवून म्हणालो !*
*त्यांच्या सोबत असलेल्या दुभाषी ड्रायव्हर व्यक्तीने त्यांना ते त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगीतले तेंव्हा *मन्सूरअलीने,,* देखील वर आकाशाकड़े पाहिले !
आणि वर हात दाखविला आणी मलाही घट्ट मिठी मारली आणी गहिवरल्या नेत्रानी दूरदूर वर हात उंचावत आमचा निरोप घेतला होता ..!
हे काय कळले नाही ! पण मन मात्र विचारात मग्न झाले . असा अनुभव आपल्याला अगदी जवळच्या प्रेमाच्या माणसांबाबतीत देखील क्वचितच अनुभवास येतो ,हे वास्तव नाकारता येत नाही …!
*इथून तिथून सर्व जगतात मानव* *आणि मानवता यांची संवेदनशीलता यांची या भेटीत जाणीव झाली.*
*मानवी निष्पाप प्रेमभावस्पर्श हे एकच असतात.*
*प्रेम , आपुलकी , आस्था , ओढ़ , काळजी , दानत , त्याग , कृतज्ञता , समाधान ही संस्कारित कनवाळू मानवी मनाची संवेदनांची प्रतीके सर्व त्रिभुवनात एकसारखी आहेत….!!!*
*ती विनामूल्य सहज देण्यासारखी आहेत ..*
अबुधाबीचे हे मानवी मनाचे *मन्सूरअली* व्यक्तिमत्व भाषेच्या पलीकडे असूनही निरागस प्रेम भाव स्पर्शातून आत्मीयतेचे दर्शन देवून जन्मोजन्मीचे ऋणानुबंध सांगून गेले हे मात्र खरे …!!!!!!!!
*इती लेखन सीमा*
*वि.ग.सातपुते ..*
*संस्थापक अध्यक्ष:-*
*महाकवी कालिदास प्रतिष्ठान*
*पुणे , मुंबई , ठाणे , मराठवाडा, (महाराष्ट्र )*
*📞( 9766544908 )*