*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित तितीक्षा इंटरनॅशनल आयोजित आदिमाया आदिशक्ती काव्य लेखन महोत्सव दहा दिवसीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त काव्य*
(अष्टाक्षरी)
*सीमोल्लंघन करू…..*
नवरात्रीचे दिवस,
आगमन दसऱ्याचे !
रंग,रूप नव रीती,
जगी या आचरण्याचे!..१
*सीमोल्लंघन* करू या,
दुष्ट अनिष्ट प्रथांचे !
स्वागत आपण करू,
नित्य नूतन जगाचे !….२
देवी शारदे स्फूर्ती दे,
साहित्य नवे लिहावे !
उदासी मनाची जावी,
कार्य नवे आचरावे !…३
रामायण ते दाखवी ,
अन्यायाचे निर्दालन!
महाभारत शिकवी ,
दुष्टांचे व्हावे दमन !…४
इतिहासातून घ्यावा ,
बोध मनी घटनांचा !
दुष्ट शक्तींना मारून,
विजय व्हावा सत्याचा !…५
*सीमोल्लंघन* करूनी,
वाट पुढील पहावी !
आयुष्यात प्रत्येकाच्या,
नवीन पहाट व्हावी !…६
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे