You are currently viewing फरक

फरक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

*🌾🌾फरक🌾🌾*

विज्ञानाने जगात होती विनाशलीला
अध्यात्माने केंद्र जगाचे मोहनलीला ।।१।।

विज्ञानाने जग आवळते फास पाशवी
अध्यात्माने जग आळवते ध्यास केशवी ।।२।।

विज्ञानाने असुर गुणांनी भरते झोळी
अध्यात्माने सुरगुणसंपत् गंध दिवाळी ।।३।।

विज्ञानाने घरात सार्‍या कचरा होतो
अध्यात्माने घरचा कचरा निचरा होतो ।।४।।

विज्ञानाच्या मानव पृच्छा देव दाखवा
अध्यात्माच्या मानव इच्छा भाव माखवा ।।५।।

विज्ञानाचा माणुस फिरतो उनाड वाटा
अध्यात्माच्या मनात फिरति कानड लाटा ।।६।।

अध्यात्माचा नाश जगी या विज्ञानेच्छा
विज्ञानींनी त्यागा पशुता अध्यात्मेच्छा ।।७।।

विज्ञानाने सर्व धावती अमर्याद ते
अध्यात्माने थांबायाची सीमा कळते ।।८।।

तरी हवे विज्ञान जगाला अध्यात्माचे
आणि हवे अध्यात्म जगाला विज्ञानाचे ।।९।।

अभ्युदय निःश्रेयससिद्धी धर्म होतसे
विज्ञानाधिक अध्यात्माने मर्म संघसे ।।१०।।

ज्ञान हवे विज्ञान हवे अन् अहंकार ही
समर्पणाचे भान हवे जे तदाकार ही ।।११।।

*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख
९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा