सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायत करीता ७३.७९ टक्के मतदान झाल. यात स्त्री १० हजार ९८२ तर पुरूष १२ हजार ००४ एकुण २२ हजार ९८६ मतदारांनी मतदान केलं. ग्रामपंचायत मतदान आकडेवारी ही पुढील प्रमाणे आहे. यात कोलगाव ७९.०६ %, मळगाव ६८.१९ %, आंबोली ६८.३३ %, चौकुळ ६६.५३ , तळवडे ७६.३४ , मळेवाड ७७.३९ , दांडेली ७७.६८ , आरोस ८८.२८ , इन्सुली ७८.३१ , डिंगणे ७७.०३ तर आरोंदा इथं ६६.७९ टक्के मतदान झाल.
तालुक्यात सर्वाधिक मतदान आरोस ग्रामपंचायतमध्ये झालं असून सर्वाधिक कमी मतदान चौकुळ ग्रामपंचायतमध्ये झालं आहे.
तहसिलदार राजाराम म्हात्रे, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.