You are currently viewing पेंडूर सातवायंगणी येथे बिबट्याचे दर्शन

पेंडूर सातवायंगणी येथे बिबट्याचे दर्शन

*पेंडूर सातवायंगणी येथे बिबट्याचे दर्शन*

▪️ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर सातवायंगणी येथील (पिंपळ) ब्राह्मण स्थळ येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास दोन बिबट्याचे दर्शन येथील ग्रामस्थांना झाले रात्री आठ ते साडे अकराच्या दरम्यान बिबटे ठाण मांडून होते त्यानंतर रात्री या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला त्यामुळे भरवस्तीत या बिबट्याच्या वास्तव्याने या गावातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे त्यात करून या गावात गव्यांचे वास्तव आणि आता या बिबट्याचे दर्शन यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. तरी लवकरात लवकर याबाबत संबंधित खात्याने याची दखल घेऊन या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा