*हे म्हातारे थकत कसे नाहीत.?*
सकाळी पाच वाजता उठतात.
सगळं आवरुन फिरायला जातात.
व्यायाम करुन हसत परत येतात.
*हे म्हातारे थकत कसे नाहीत.?*
नातवंडाशी खेळून मस्ती करतात.
घरभर पळून उच्छाद मांडतात.
पोथ्या पुराणे देव पुजेत रमतात.
*हे म्हातारे थकत कसे नाहीत.?*
पेपर वाचतात, बातम्या पाहतात.
राजकारणावर हिरीरीने बोलतात.
नाटक सिनेमा आवडीने पाहतात.
*हे म्हातारे थकत कसे नाहीत.?*
दुध भाजी किराणा आणतात.
नातवंडाना शाळेत सोडतात.
संध्याकाळी त्यांना खेळायला नेतात.
*हे म्हातारे थकत कसे नाहीत.?*
पडतात धडपडतात, परत उठतात.
एव्हढसं खातात, खूप औषधं घेतात.
निशाचरागत जागत बसतात.
*हे म्हातारे थकत कसे नाहीत.?*
लग्न समारंभात सतत मिरवतात.
लहान थोरांची खुशाली विचारतात.
ताजेतवाने होऊन घरी परततात.
*हे म्हातारे थकत कसे नाहीत.?*
*ते कधीच थकणार नाहीत.*
*कारण ते म्हातारे नाहीत*
🌟 *तर ते महा-तारे आहेत.*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*✒️✒️✒️✒️✒️✒️