*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठवांचे गीत…*
मोरपिसासम स्पर्श तुझा हा
ह्रदयविणा झंकार
डोहामधे थेंब थरारे
जागली प्रीत अनिवार…१
विसरणार ते खासच नाही
आठवणींचा सुरम्य दरवळ
दिल्या घेतल्या वचनांचाही
ह्रदयी राहिल सदैव परिमळ..२
निळ्या शार घनगर्द नभातील
एक तारका हळूच हसली
चंद्र बावरा कातर झाला
प्रीत कशी ही तुमची असली..३
तुला कळेना मला कळेना
उलगडले मी किती मनास
उधळत मोती श्रावणातले
मृद्गंधांकित परिमल खास…४
आठवतो तो कातळ काळा
कधी त्यावरी बसलो होतो
वेचून शब्दफुलांना आपण स्वरधारेतच गुंफत होतो..५
कळले नाही मला कधीही
काळ सुखाचा अविरत सरला
मनात गुणगुणारा कोकीळ
फांदीवरती झुलून गेला…!!६
फांदी वरती….. झुलून गेला……….
✨✨✨✨✨✨✨✨.
*अरुणा दुद्दलवार*@✍️