*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उंबरठा…*
उंबरठा मनातला
मनोभावे सांभाळला
सूर ऐकला आतला
कौल मनीचा पाळला…
हृदयाने जे जाणले
त्यात मग्न मी जाहले
केली छाननी तत्वांची
नाही कशास भाळले ..
विरोधात प्रवाहाच्या
जरी गेले अनेकदा
ओलांडल्या नाही सीमा
बंध नीतीचा एकदा ..
अवास्तव कल्पनांना
कधी नाही दिले स्थान
लढाईत अस्तित्वाच्या
केला इतरांचा मान
*राधिका भांडारकर*