*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सरिता परसोडकर लिखित अप्रतिम लावणी*
*थंडी वाजतीया फार*
नाव गाव काय पुसता, मी आहे की नाजूक नार
शेकोटी जराशी पेटवा, थंडी वाजतीया हो फार…//१//
येता अंगात ज्वानीची कळ, मन पाखरू धरते जोर
चाखा गुलकंद हा गोड, नका चाखु ते आंबट बोर
जिव तळमळतो हा किती, किती लावाल आणखी वार..
शेकोटी जराशी पेटवा, थंडी वाजतीया हो फार.//१//
रसरशीत डाळिंबओठी, अहो अलगत मारा मिठी
कसं भिरभिरत पाखरू, तृषार्त हरीनी साठी
मदनाचा पिसाट वारा, गिरकी घेतो या गार..
शेकोटी जराशी पेटवा, थंडी वाजतीया फार..//२//
लावा आरसे रंगमहाली, ठेवा तबक विडा सुपारी
समोर रंगीत पिकदाणी, अंगी भरली आता खूमारी
प्रेम गुलाला घेऊनी हाती, माखा ज्वानीचं अंग सार .
शेकोटी जराशी पेटवा, थंडी वाजतीय फार…//३//
सौ सरिता परसोडकर पुसद✒️,