*कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे संकेत*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांना सकाळी साखर झोपेमध्ये पडलेले स्वप्न*.
*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण साहेब हे होणार असे मला जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांना आज सकाळी साखर झोपेमध्ये स्वप्न पडले असून श्री पाटेकर व उपरलकर देवस्थान माझ्या स्वप्नात आले आणि मला सांगितलं की तुझे जवळचे सहकारी रवींद्र चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री होणार आहेत मला झोपेत स्वप्न* *पडल्यानंतर मला खडबडून जाग आली आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना केली की* *खरोखरच रवींद्र चव्हाण साहेब यांना मुख्यमंत्री म्हणून करा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना केली*.
*मध्यंतरी आठ ते दहा दिवसांपूर्वी एक व्यक्ती उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे अपघात झालेला होता त्याच्याबरोबर काही व्यक्ती मित्र नातेवाईक होते तेवढ्यातच मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रात्री पोहोचलो असता त्या कुटुंबीयांना मी धीर दिला*.
*मेंदूला मार असल्याने सिटीस्कॅन करण्यासाठी डॉक्टरांनी सल्ला देऊन ताबडतोब लगेचच सिटीस्कॅन मशीन मध्ये रिपोर्ट करण्यासाठी सांगितले. हा व्यक्ती एकदमच गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल होता. त्याची आर्थिक परिस्थिती कुटुंबाची नव्हती तर मी सांगितलं काही पैसे द्यावे लागणार नाही. आज तुमचं सिटीस्कॅन हे मशीन रिपोर्ट मोफत होणार आहेत. शासनामार्फत यासाठी आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनीही सिटीस्कॅन मशीन जनतेला आरोग्य सुविधा मिळावी या हेतूने माझ्या शब्दाला सावंतवाडी तसेच कणकवली येथे ही सिटीस्कॅन मशीन मंजूर केली आहे त्याचे नातेवाईक मला म्हणाले तू तर काँग्रेसचा मोठा नेता आहे*
*पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपचे मोठे नेते आहेत व मंत्री आहेत तुझ्या शब्दाला असं काय किंमत रवींद्र चव्हाण साहेबांनी दिला? असे मला सांगितल्यानंतर मी सांगितले गेल्या वीस वर्षांपूर्वी ते मुंबई मुंबई डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक असून सभापती होते*.
*त्यांच्या नातेवाइकांना बिल्डिंग बांधण्यासाठी ते बिल्डर असल्याने सावंतवाडी येथे जागा पाहिजे होती. मी त्यांना माझ्या मित्रांच्या ओळखीने ते व त्यांचे नातेवाईक माझ्याकडे आले होते. मी त्यांना सावंतवाडी परुळेकर रुग्णालय उर्दू शाळेच्या समोर पंधरा गुंठे जागा माझ्या मित्रा जवळ असल्याने ती जागा दाखवून खरेदी करण्यात आली. त्यामुळे संबंधातून माझे त्यांचे जवळचे वीस वर्षांपूर्वीचे संबंध आहेत*.
*ते भाजपमध्ये असल्याने नगरसेवक व सभापती असताना सुद्धा मला भाजपमध्ये येण्यासाठी आग्रही होते तसा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु मी त्यांना भाजपमध्ये येण्यास नाकारले होते माझी त्यांची चांगले मैत्रीपूर्वक संबंध असल्याने ते माझ्या सोन्या-चांदी दागिन्यांच्या दुकानांमध्ये यायचे गप्पागोष्टी मारायचे*.
*ते सावंतवाडी मध्ये कुठे मला दिसल्यानंतर माझी विचारपूस करायचे एवढे माझे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांच्या संबंधातून मी माझ्या दुकानाच्या समोर रविवारी केस कापण्यासाठी सलून मध्ये बसलो असता ज्या दिवशी अजित पवार भाजप मित्र पक्षामध्ये दाखल झाले त्या दिवशी त्यांना सहजच मी फोन लावला. गोरगरीब रुग्ण माझ्याकडे येत असतात त्यांना मी जीवनदायी आरोग्य योजना ची माहिती बऱ्याच रुग्णालयात खाजगी रुग्णालयात इलाज करण्यासाठी पाठवत असतो असे रुग्ण माझ्या जिल्ह्यातील नेहमीच संपर्कात असतात यामुळे गोरगरिबांची आर्थिक परिस्थिती रिपोर्ट काढण्यासाठी नसते हे मी त्यांना सांगितल्यानंतर तुम्ही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिटीस्कॅन मशीन मंजूर करा तसेच कणकवलीला मंजूर करा हा प्रस्ताव मी त्यांना फोनवरती बोलल्यानंतर यामुळे संपूर्ण जिल्ह्याला गोरगरीब रुग्णांना लाभ मिळू शकतो.त्यांनी तात्काळ मला सांगितलं की तू ईमेल कर मी सिटीस्कॅन मशीन सावंतवाडी कणकवलीला मंजूर करतो असे सांगितल्यानंतर आठ दिवसांमध्ये ती मशीन जिल्हा नियोजन च्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आली*
*कुठल्या राजकारणापलीकडे जाऊन मंजूर करण्यात आली.आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्यामुळे आज ती रुग्णालयात दाखल होऊन मोफत लाभ या सिटीस्कॅन मशीनचा गोरगरीब रुग्णांना होत आहे असे सांगितल्यानंतर त्यांचे डोळ्याचे पारणे भरून आले आणि त्यांनीच रवींद्र चव्हाण साहेब व मला आशीर्वाद दिला*
*रवींद्र चव्हाण साहेब हे कोणतरी आता आहेत त्याच्यापेक्षा मोठे नेते मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री व्हावे असे मला त्यांनी सांगितले खरोखरच हा चमत्कार होऊ शकतो का? गोरगरिबांचे तर आशीर्वादच पालकमंत्र्यांना आहेत .पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना कुठल्या प्रकारचे राजकारण न पाहता मी काँग्रेसचा असू नये गोरगरिबांच्या दुःख पुसण्यासाठी त्यांनी जे केलेले कार्य सार्थकी लागेल असे मला वाटते .त्यामुळे आज मला सकाळी साखर झोपेमध्ये स्वप्न पडलं की तुझे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री होणार खरोखर ईश्वर हे स्वप्न साकार करणार की काय? गोरगरीब रुग्णांची आशीर्वाद मिळालेले आहेत ते नक्कीच व्हावे मुख्यमंत्री असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो*
*आपला विश्वासू* *राजेंद्र मसूरकर सावंतवाडी*