*डाॅ. उत्तम फोंडेकर यांच्या हापूस पेटीची लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल भाजपा किसान मोर्चाच्या वतीने जेष्ठ नेते विलासजी हडकर यांच्या हस्ते सत्कार* .
मालवण
मालवण कुंभारमाठ येथील प्रतिथयश अंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांनी दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधत दि. २ नोव्हेंबर रोजी या वर्षातील पहिली हापूस आंब्याची पेटी नाशिक येथे थेट ग्राहकांपर्यंत पाठविण्याचा मान पटकावीला असतानाच त्यांची ही आंबा पेटी भारतातच नव्हे तर यंदाची जगातील पहिली आंबा पेटी म्हणून लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये गणली गेली आहे. यामुळे यशस्वी आंबा व्यावसायिक असणाऱ्या डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या या कामगिरीची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली असून या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असताना भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मालवण – कुंभारमाठ येथील निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच त्यांच्या आंबा बागेत जाऊन फळांची पहाणी करून माहीती घेतली .
या वेळी डाॅक्टर उत्तम फोंडेकर यांच्या कुटुंबीयांचा सत्कार भाजपा चे जेष्ठ नेते विलासजी हडकर यांचे हस्ते करण्यात आला .
यावेळी किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष *श्री उमेश सावंत* , भाजप जिल्हा उपाध्यक्ष व किसान मोर्चा जिल्हा प्रभारी *श्री प्रसन्न उर्फ बाळू देसाई* , किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष *श्री किशोर नरे* , जिल्हा सरचिटणी *श्री गुरुनाथ पाटील*, किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य *श्री बाळासाहेब सावंत*, किसान मोर्चा मालवण मंडल अध्यक्ष *श्री महेश सारंग* , भाजपा
मालवण शहर मंडल अध्यक्ष *श्री बाबा मोंडकर* , किसान मोर्चा ओरोस मंडल अध्यक्ष *श्री महादेव सावंत* , आंबा बागायतदार व माजी नगरसेवक *श्री आप्पा लुडबे*, जिल्हा FPC प्रमुख *श्री यशवंत पंडित* , FPC प्रभारी *श्री प्रसाद भोजने*, आंबा सुपारी बागायतदार *श्री भाऊ सामंत*, कुंभारमाठ बूथ अध्यक्ष *श्री भोगवकर* , *निलेश माणगावकर* , *रामकृष्ण शिंदे* , इत्यादी मान्यवर उपस्थित होते .