सावंतवाडीत ५ ते ९ डिसेंबरला मोफत योग शिबीराचे आयोजन….
सावंतवाडी
पतंजली योग समिती सिंधुदुर्ग मार्फत सावंतवाडीत योगोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर वैश्य भवन, गवळीतिठा येथे ५ ते ९ डिसेंबर या कालावधीत सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत होणार आहे.
यात सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन, ऍडव्हान्स योग, आयुर्वेद तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत विशेष वर्ग होतील. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाईल. हे योग शिबीर निःशुल्क आहे. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर 9823881712, महेश भाट 9975543446 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.