You are currently viewing थंडी

थंडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*थंडी*

 

थंडी वाढली हुडहुडी आली

कुडकूडू लागली थंडी वाजली

 

विना घंटी ची ना भोंग्याची

ऐकू न येता थंडी वाजली

 

बोचरी थंडी लाजरी थंडी

नाचवू लागली थंडी वाजली

 

स्वेटर शाल गोधडी कंबल

शेकोटी पेटली थंडी वाजली

 

खारीक खोबरे मेथी डिंक उडीद

तीळ लाडू खाऊन थंडी पळाली

 

प्रतिकाराची नशा अंगी बानली

जगण्याची शिकवण घेऊन आली

 

थंडी वाढली हुडहुडी आली

कुडकूडू लागली थंडी वाजली

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

8208667477.

7588318543.

प्रतिक्रिया व्यक्त करा