मणेरी सातेरी देवीचा जत्रोत्सव 4 डिसेंबरला
दोडामार्ग :
मणेरी गावचा श्री देवी सातेरी चा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी देवीला अभिषेक, ओटी भरण्याचा कार्यक्रम विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच रात्री मामा मोचेमाडकर यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मणेरी ग्रामस्थांनी केले आहे.