You are currently viewing अरुण मोर्यें व कुटुंबियांकडून नट वाचनालयाला एक लाख रुपयांची देणगी…

अरुण मोर्यें व कुटुंबियांकडून नट वाचनालयाला एक लाख रुपयांची देणगी…

अरुण मोर्यें व कुटुंबियांकडून नट वाचनालयाला एक लाख रुपयांची देणगी…

बांदा

येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण सोनू मोर्ये व कुटुंबीय यांनी आपले आईवडील (कै.) सोनू लक्ष्मण सावंत-मोर्ये व (कै.) हौसाबाई सोनू सावंत-मोर्ये यांच्या स्मरणार्थ येथील नट वाचनालयाला एक लाख रुपयांची देणगी दिली.
वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी ही देणगी रक्कम स्वीकारली. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, प्रकाश पाणदरे, अनंत भाटे, महाबळेश्वर सामंत, कोकण विकास संस्थेच्या श्रुती तारी, सौ. अनुराधा मोर्ये, भद्र मोर्ये, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सुनील नातू आदी उपस्थित होते.
या देणगीच्या रकमेतून मिळणाऱ्या व्याजातून वाचनालयच्या वतीने दरवर्षी शालेय मुलांसाठी स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहे. मोर्ये कुटुंबियांच्या दातृत्वाबाबत वाचनालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा