You are currently viewing पर्यटन पाणबुडी प्रकल्प जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी दिशादर्शक ठरेल

पर्यटन पाणबुडी प्रकल्प जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी दिशादर्शक ठरेल

पर्यटन पाणबुडी प्रकल्प जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी दिशादर्शक ठरेल

पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन पाणबुडी प्रकल्पासाठी 47 कोटी निधी केंद्रशासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबत खासदार नारायण राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांसह केंद्र शासनाचे पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी अभिनंदन केले आहे.

 

पर्यटन प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा हजार पेक्षा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार असून निवास व्यवस्थेमध्ये ही वाढ होणार आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यात एकमेव महाराष्ट्र राज्याचा हा नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्शील असून जिल्हाच्या पर्यटन वाढीचा उद्धेश ठेऊन पर्यटन व्यावसायिक महासंघ ने सदर पर्यटन पाणबुडी प्रकल्प साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या माध्यमातून राज्यस्तवर बैठकही आयोजित करून या प्रकल्पाला निधी उपलध्द करण्यामागे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. तसेच खासदार श्री नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकार कडून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या पर्यटन पाणबुडीचे वैशिष्ट असे आहे की या मध्ये बसून सिंधुदुर्गातील खोल समुद्रातील अपरिचित सागरी विश्व पर्यटकाना पाहता येणार आहे. विविध प्रकारची कोरल, मासे जलसंपदा पर्यटक अनुभवणार असून सिंधुदुर्गातील जलपर्यटनाचा आलेख जागतिक पातळीवर उंचावणार आहे. चालू पर्यटन हंगामात ही पर्यटन पाणबुडी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा