*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार कवी विनय सौदागर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*इकास*
v/v/s……
काय सांगू बाबा
इकास इलो दारात
गावगाडो मेलो त्येची
काडतहत वरात
जंगला सपान गेली
वाघ गावात फिरता
भूक त्येची भागाना
कुत्र्या मांजराक होरता
समाजसेवक गावचे
जमनी खपयतहत
सातबारे फडफडयत्
गावाक दमयतहत
कामाक कोण मेळाना
शेती नावापुरती
म्हातारे करवादतत
घरा ओकीबोकी
शिकलेले शेहराकडे
गरीब फुकट्याकडे
पिढी बरबाद होता
टुर्लामेंटीकडे
ह्येचो शेवट ह्योच
गाव सरत चल्लो
समाधानी जगण्यार
इकासाचो डल्लो.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी
9403088802….६०