You are currently viewing जिल्हा युथ आयकॉन निवडी करीता इच्छुकांना आवाहन

जिल्हा युथ आयकॉन निवडी करीता इच्छुकांना आवाहन

जिल्हा युथ आयकॉन निवडी करीता इच्छुकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

 राज्यातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत सन 1994 या वर्षापासून दरवर्षी दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशातील संस्कृती व परंपरा जतन करून या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रातिनिधीक युवा संघ वरील राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होतो.

याकरिता ज्या युवांनी युवक कल्याण क्षेत्रात तसेच युवांना प्रभावित करणारे कार्य केलेले 15 ते 29 वयोगटातील युवांची 10 नावे युथ आयकॉन म्हणून जिल्हास्तरावरून विभागस्तराकरिता निवडण्यात येतील. तरी इच्छुक युवांनी आपल्या कार्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करावी. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड (संपर्क क्रमांक. ९७६६९६५९९६/ ९१०३९३६०९८) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा