*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*क्रांती सूर्य* (काव्यांजली)
क्रांतीसूर्य ज्योतिबा
प्रखर तेजस्वी पुरूष
बदल अनुरूप
घडविले।।
सत्याचा आग्रह
शेतक-यांचा झाला पोशिंदा
मदतीचा खांदा
खंबीर।।
सामाजिक सुधारणा
धरली नवविचारांची कास
सद्सद्विवेकबुध्दीची आस
डोळस।।
शिकवले सावित्रीला
महिला शिक्षित केल्या
यातना सोसल्या
खडतर।।
वृद्ध अनाथ
सेवा तीच मानली
उभयतांनी धरली
सावली।।
करावे स्मरण
समाज सुधारक ज्योतिबांचे
सत्य समानतेचे
पुरस्कर्ते।।
〰️〰️〰️〰️〰️〰️🌹🌿अरूणा दुद्दलवार✒️