You are currently viewing एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला

मुंबई

निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळालं आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या. राज्यात महायुतीचं सरकार आलं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम आहे. यादरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळावर आपण समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं. “मी मोदींना फोन केला आणि माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुतीचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची, उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल जो काही निर्णय घेईल त्याला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल. जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असं सांगितलं आहे. कोणतीही कोंडी, नाराजी नाही आहे. येथे कोणताही स्पीडब्रेकर नाही. महाविकास आघाडीचा स्पीडब्रेकर आम्ही काढला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह जो काही निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा