You are currently viewing मळेवाड गावात जिल्हा बँकेची एटीएम सुविधा द्यावी

मळेवाड गावात जिल्हा बँकेची एटीएम सुविधा द्यावी

मळेवाड गावात जिल्हा बँकेची एटीएम सुविधा द्यावी

उपसरपंच हेमंत मराठे यांची जिल्हा बँक अध्यक्षांकडे मागणी

मळेवाड

मळेवाड गावात जिल्हा बँकेची एटीएम सुविधा द्यावी अशी मागणी उपसरपंच हेमंत मराठे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडे केली आहे. याबाबत मनीष दळवी यांनी सकारात्मकता दर्शवली असून लवकरच ही मागणी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती हेमंत मराठे यांनी दिली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावात जिल्हा बँकेची शाखा आहे सावंतवाडी मुळेवाड शिरोडा या मार्गावरून दिवसा गाडी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची येजा असते तसेच मळेवाड चौक हा नेहमीच गजबजलेला असतो.मात्र या ठिकाणी कोणत्याही बँकेचे एटीएम नसल्याने एखाद्याला तात्काळ पैशांची गरज असली तर त्याला एटीएम नसल्याने पैसे मिळणे शक्य होत नाही.यामुळे मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा मळेवाड या ठिकाणी जिल्हा बँकेचे एटीएम मिळावे यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,संचालक महेश सारंग यांच्याकडे एटीएम साठी मागणी केली असून या दोघांनी एटीएम देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.लवकरच एटीएम च्या मागणीची पूर्तता करण्याचेही आश्वासन अध्यक्ष मनीष दळवी व संचालक महेश सारंग यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा