You are currently viewing मुखवटे

मुखवटे

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मुखवटे*

मुक्तछंद काव्य लेखन

*नित्य नविन*

 

आयुष्याच्या रंगमंचावर आहेत

प्रत्येकजण एकेक कलाकार

लेऊनी नवनविन मुखवटे

असतो तयांचा नित्य वावर…..

सुखाचा शोध घेताना मनु

हरवून बसतो स्वतःला स्वतःत….!

सुखाच्या पाठून असते करत

दुःख त्याचा पाठलाग अविरत…..

क्षणैक सुख , मोह… लालसेत

जातो गुरफटून…. तोंडावर आव

खोटेपणाचा , हसू , रडू मिश्रीत

असतो जगाला दाखवत तो

स्वतःचीच खोटी पत आणि गत….

मुखावट्याच्या पाठी तयाचे डोळे

डबडबलेले …. अश्रूने , सदगदित तो ,

पण हसत असतो वरवर…..

एखाद्या विनोदी विदुषकासम

दुसऱ्यांना हसवताना मात्र

आतून रडत असते त्याचे अंतरंग…

दुःखाश्रू सावरत… नैराश्याने ग्रासलेले

मन त्याचे आतल्याआत

रहाते कुढत…… कण्हत…….!!

 

*मानसी जामसंडेकर, गोवा*

प्रतिक्रिया व्यक्त करा