दरीत कोसळलेल्या अपघातग्रस्त आयशर कॅन्टर मधील जुनी भंगाराच्या भांड्यांची चोरी पकडली.*
सदर कारवाईत वाहनासह ५,३६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
बांदा
आज पहाटेच्या 4.30 वा.चे सुमारास पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई व पोलीस नाईक मनिष शिंदे हे आंबोली घाटात पेट्रोलिंग करीत असताना,वेंगुर्ला ते बेळगाव जाणारे रस्त्यावर आंबोली घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी आरोपीत 1) अर्जुन उमाजी गोसावी, वय-23 वर्षे,2) अक्षय नेताजी गोसावी, वय- 25 वर्षे 3) विशाल गुलाब गोसावी,वय-27 वर्षे,4) राहूल मारुती कोरवी,वय-27 वर्षे, सर्व रा.निपाणी आधयनगर,गोसावी गल्ली,ता.निपाणी, उपजिल्हा चिक्कोडी, जि.बेळगाव,राज्यं कर्नाटक (5) जय नेताजी गोसावी, वय-24 वर्षे,रा.कलमठ फिश मार्केट, बाजारपेठ,ता. कणकवली,जि. सिंधुदुर्ग,मुळ रा. निपाणी आश्रयनगर, गोसावी गल्ली,ता. निपाणी,उपजिल्हा चिक्कोडी,जि. बेळगाव,राज्यं कर्नाटक 6) सुनिल श्रीमंत माळी, वय-28 वर्षे, रा.इचलकरंजी,वॉर्ड नं. 10/733,गोसावी गल्ली,दत्तं विडीओ समोर,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर यांनी वाहनमालक भगवान सीताराम गुरव यांच्या मालकीच्या दरीत कोसळलेल्या अपघातग्रस्त आयशर कैन्टर रजि.नं. MH-07-AJ-6691 या वाहनातील अपघातात जळालेली जुनी काळपट भंगारची भांडी गोळा करुन अशोक लेलैंड दोस्त रजि. नं. MH-09-GJ-2887 या वाहनात भरणा करुन चोरी करुन घेऊन् जात असताना पोहेकॉ/937 दत्तात्रय देसाई,पोना/1153 शिंदे यांना पेट्रोलिंग दरम्याने मिळून आलेले आहेत.म्हणून त्यांचे विरोधात भारतीय न्याय संहिता कलम-303 (2), 3(5) प्रमाणे सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर कारवाईत वाहनासह एकूण 5,36,000/- रु किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री.अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई,दिपक शिंदे, मनिष शिंदे,पोकों/अभिजीत कांबळे, राजेश नाईक यांनी केलेली आहे.