मालवण केंद्रावर ९ पासून राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी*
चार नाटके होणार सादर
मालवण
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२४-२५ ची प्राथमिक फेरी ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत मालवण केंद्रात मामा वरेरकर नाट्यगृहात होणार आहे. राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात होत आहे. सिंधुदुर्गातील नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गतवर्षी नऊ नाटके सादर झाली होती. यावेळी फक्त चारच नाटके सादर होणार आहेत.
सोमवार ९ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता ‘द कॉन्शन्स’ (बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक अमेय दक्षिणदास, दिग्दर्शक केदार सामंत आहेत. बुधवार ११ रोजी सायंकाळी ७ वाजता “ओएँ
सिस’ (अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा मालवण) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक इरफान मुजावर, दिग्दर्शक हेमंत कदम आहेत. गुरुवार १२ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता ‘मुक्काम पोस्ट भोकरवाडी’ (क.म.शि.प्र. मंडळाची आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक केदार सामंत, दिग्दर्शक शमा वैद्य आहेत. शुक्रवार १३ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘झम्पय’ (अक्षरसिंधु साहित्य कलामंच, कणकवली) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक विजय चव्हाण, दिग्दर्शक सुहास वरुणकर आहेत. सर्व नाट्यप्रेमींनी नाटकांचा लाभ घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभाग अपर मुख्य सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*