You are currently viewing साटेली -भेडशी मतदार संघात “दीपकभाईच” पॉवरफुल

साटेली -भेडशी मतदार संघात “दीपकभाईच” पॉवरफुल

साटेली -भेडशी मतदार संघात “दीपकभाईच” पॉवरफुल*

शिवसेना व महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विधानसभा मतदार प्रमुख प्रेमानंद देसाई यांनी मानले आभार*

साटेली-भेडशी जि.प.मतदारसंघ मध्ये तब्बल २०९१ चे मताधिक्य*

दोडामार्ग

कोनाळ पंचायत समिती मतदार संघात तब्बल १११८ चे दीपक.केसरकर यांना मताधिक्य तर साटेली भेडशी पंचायत समिती मतदार संघात ७७९ मताधिक्य असे मिळून साटेली भेडशी जि. प. मतदार संघात एकूण २०९१ चे मताधिक्य घेऊन दीपक केसरकर हे विजयी झाले, याबद्दल सर्व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार शिवसेना विधानसभा मतदार संघ प्रमुख तथा उमेदवार प्रतिनिधी प्रेमानंद देसाई यांनी मानले आहेत.

गाव निहाय पाहता केर ९३, मोर्ले६६, पाळये५५, तेरवण ९८, मेढे २१४, हेवाळे६२, कोनाळ २१२, केंद्रे २८,घोटगेवाडी१४१असे एकुण १११८ चे मताधिक्य मिळाले तर उर्वरित साटेली-भेडशी ३९७, बोडदे ९५, शिरंगे ११५, मांगेली१२७, घोटगे १७ असे ७७९ इतके मताधिक्य मिळवून साटेली-भेडशी जिल्हा परिषद मध्ये २०९१ मतांचे मताधिक्य मिळविले. दीपक केसरकर यांनी केलेल्या विकास कामांची ही पोच पावती असून यासाठी महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय च्या तालुका प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, मतदारसंघ प्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख, मंडळ अध्यक्ष यांनी अपार अहोरात्र मेहनत घेतली. यासाठी शिवसेना मतदारसंघ प्रमुख तथा दीपकभाई केसरकर यांचे उमेदवार प्रतिनिधी प्रेमानंद देसाई यांनी यां सर्वांचे आभार मानले असून आपल्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा