*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्री केशवराज हे विष्णूचे स्थान कोकणांत रत्नागिरी जिल्ह्यात दापोली जवळ *”आसूद गाव”* येथे आहे. डोंगरातील रमणीय स्थान.श्री विष्णू देवास वंदन!*
🌹 *”श्री केशव राज प्रसन्न”*🌹
केशवा तव कीर्ती राहे दिगंत महान
कुलस्वामी कुलदैवतांस करू वंदनIIधृII
आसूद गावी अवतरसी भू कोकणांत
दूर गिरी शिखरी एकांती राहे वसून
पांडवांनी बांधिले मंदिर अति प्राचीनII1II
श्यामल मूर्ती दिसते मनमोहक छान
निर्मळ गंगा जळ वाहे धेनु मुखांतून
अथांग सागर वैभव राहे साक्षीनंII2II
विविध तरुंची छाया आहे कोकण संपन्न
द्वारी मारुती उभा आहे गरुड वाहन
सर्व जनांचे श्रद्धास्थान करिती रक्षणII3II
शंख चक्र गदा पद्म चतुर्भुजा धरून
तुलसी हार कौस्तुभ मणी कंठी लेवून
मुकुट शिरी श्रीमुख शोभे तेज विलसूनII4II
लक्ष्मीकांत केशवा अर्पितो पुष्प चंदन
ओवाळीतो धूप दीप नैवेद्य निरांजन
विश्व पालका करा भक्तांचे मनोरथ पूर्णII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.