You are currently viewing ५५ वर्षांत पहिल्यांदाच देशाचा प्रजासत्ताक दिन कोणत्याही प्रमुख पाहुण्याशिवाय!!!!!

५५ वर्षांत पहिल्यांदाच देशाचा प्रजासत्ताक दिन कोणत्याही प्रमुख पाहुण्याशिवाय!!!!!

यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला कोणत्याही देशाचे प्रमुख उपस्थित नसतील. कोरोना संकटामुळे यंदाच्या सोहळ्याला कोणत्याही देशाचे अध्यक्ष किंवा पंतप्रधान म्हणून उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. कोरोना संकट असल्याने कोणत्याही देशाच्या प्रमुखाला निमंत्रित केले गेले नसल्याचे मंत्रालयाने सांगितले. त्यामुळे ५५ वर्षांत पहिल्यांदाच देशाचा प्रजासत्ताक दिन कोणत्याही प्रमुख पाहुण्याशिवाय साजरा होईल.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आले होते़ मात्र ब्रिटनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्याने जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द केला. जगातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे कोणत्याही देशाच्या प्रमुखांना आमंत्रित करणे तितकेसे सोपे नाही.

गेल्या वर्षी फेब्रुवारीत अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामुळे कोरोना पसरल्याचा आरोप करत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले होते़ अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वाढला असताना ट्रम्प यांना निमंत्रित करण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा