You are currently viewing लाडक्या बहिणीला आर्थिक मदती बरोबर सन्मानही द्या… ॲड. नकुल पार्सेकर

लाडक्या बहिणीला आर्थिक मदती बरोबर सन्मानही द्या… ॲड. नकुल पार्सेकर

“लाडक्या बहिणीला आर्थिक मदती बरोबर सन्मानही द्या…
अॅड. नकुल पार्सेकर

विधानसभेची निवडणूक पार पडली. निकालही लागले. आणि पाशवी बहुमत घेऊन आलेले सरकारही आता स्थापन होवून खऱ्या अर्थाने जनकल्याणासाठी काम करेल अशी नेहमीप्रमाणे अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत जे प्रचंड प्रमाणात गैरप्रकार झाले आणि आर्थिक उलाढाल झाली तसा प्रकार यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळाला नव्हता. निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा गैरवापर, मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर आणि वारेमाप घोषणा यांचा पाऊस पडला.
निवडणुकीच्या काळात उमेदवार, कार्यकर्ते आणि नेते एकमेकांवर अगदी टोकाचे आरोप करतात. आरोप- प्रत्यारोप हा प्रचारात महत्त्वाचा भाग असतो. खोटा प्रचार हा आता समाज माध्यमातून एवढ्या वेगाने पसरतो की त्याचे परिणाम निकालावर तर होतातच पण संबंधित उमेदवारालाही मोठा मानसिक ञास सहन करावा लागतो.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राहिलेल्या अर्चना परब जी आमची लाडकी भूमिकन्या आहे. आघाडीची उमेदवारी मिळाली नाही म्हणून फक्त आणि फक्त गेल्या सात- आठ वर्षात जोडलेल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. गेले वीस दिवस मी अर्चनाताईंच्या बाबतीत निवडणूकीच्या अनुषंगाने घडलेल्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार आहे. अशा प्रकारे आलेली प्रत्येक आॅफर त्यानी ठामपणे धुडकावून लावली, राजकारणात अशा प्रकारे पैसे कमवणे म्हणजे आपण आपल्या मतदारांशी आणि जनतेशी गद्दारी करण्यासारखेच आहे.. पैशापेक्षा लोकाचं प्रेम व विश्वास हा त्यांच्यासाठी लाखमोलाचा आहे. एवढ्या सचोटीने वागणाऱ्या या आमच्या भगीनीवर अनंत मांजरेकर यांनी समाज माध्यमातून अर्चनाताईनी मत विभागणी करण्यासाठी पाच कोटी घेतले असा धादांत खोटा आरोप करून एका महिलेचा अपमान केलेला आहे. अशी बदनामीकारक पोस्ट करुन राजकारणात आणि समाजकारणात चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या या महिला भगिनींची अशा प्रकारे निंदा नालस्ती होत असेल तर अशा प्रवृत्तीला वेळेत ठेचणं गरजेचं आहे. राजकारण हे फक्त धनदांडग्यांनी आणि गुंडा- पुंडानीच करावं आणि बाकीच्यानी यांच्या फक्त पालखीचे भोई व्हावे हे चित्र भविष्यात बदलायचे असेल आणि अर्चनाताई सारख्या स्वच्छ प्रतिमेच्या सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या महिला जर राजकारणात येण्याची आवश्यकता असेल तर अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
ज्या आमच्या असंख्य लाडक्या बहिणीमुळे महाराष्ट्रात लाडक्या भावांच सरकार स्थानापन्न होणार आहे त्यांनी लाडक्या बहिणींच्या आर्थिक उन्नती बरोबर त्यांचा सन्मानही जपला पाहिजे.
या जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पोलीस प्रशासनाकडे मी विनंतीपूर्व मागणी करतो की त्यांनी अशा प्रवृत्तीला कायद्याच्या कक्षेत योग्य ती शिक्षा द्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा