वेंगुर्ले नगर वाचनालयाच्या वतीने ८ डिसेंबरला चित्रकला स्पर्धेचे आयोजन…
वेंगुर्ला
येथील नगर वाचनालयाच्या वतीने ८ डिसेंबरला वेंगुर्ला तालुका मर्यादित चित्रकला स्पर्धा संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा इयत्ता ५वी ते ७वी आणि इयत्ता ८वी ते १०वी अशा दोन गटात घेण्यात येणार असून प्रवेश फी ठेवण्यात आलेली नाही.
इ.५वी ते ७वीच्या मुलांनी फुगेवाला व फुगे विकत घेणारी मुले, कबड्डी खेळणारी मुले, पावसाचा आनंद घेणारी मुले आणि घरात वाचनात मग्न असणारी भावंडे यापैकी एका विषयावर चित्र काढायचे आहे. चित्रात किमान तीन व्यक्तिरेखा असणे आवश्यक आहे. ही स्पर्धा ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार असून एका शाळेतून जास्तीत जास्त दहा स्पर्धक सहभागी होऊ शकतात. यातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ११००, ९००, ७०० आणि उत्तेजनार्थ ५००ची दोन पारितोषिके देण्यात येतील.
इ.८वी ते १०वीच्या मुलांनी दुकानात पुस्तके विकत घेणारे कुटुंब व दुकानदार, शाळेच्या कट्टयावर वाचनात मग्न असणारी मुले, गणपतीची आरती करणारे कुटुंब आणि घराच्या अंगणात खेळणारी मुले यापैकी एका विषयावर चित्र काढायचे आहे. चित्रात किमान चार व्यक्तिरेखा असणे आवश्यक आहे. ही स्पर्धा ८ डिसेंबर रोजी सायं.३.३० ते ५.३० या वेळेत होणार असून एका शाळेतून जास्तीत जास्त दहा स्पर्धक सहभागी होऊ शकतात. यातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १५००, ११००, ९०० आणि उत्तेजनार्थ ७५०ची दोन अशी पारितोषिके देण्यात येतील.
चित्र काढण्यासाठी २७.७५ सेमी बाय ३७.७५ सेमीचा कागद असणार आहे. कागदाच्या कडेला २ सेमी. बॉर्डर सोडून चित्र काढावे. चित्र काढताना ट्रेस पेपर किवा भौमितिक साधनांचा वापर करू नये. प्रत्येक स्पर्धकाने शाळेचे ओळखपत्र, आधारकार्ड स्पर्धेच्यावेळी आणणे आवश्यक आहे. शिक्का असलेल्या भागावर स्वतःचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव आणि संफ क्रमांक घालावा. दोन्ही गटातील स्पर्धकांनी आपली नावनोंदणी शाळेमार्फत, पालकांनी किवा स्वतः कार्यालयीन वेळेत ६ डिसेंबर पर्यंत करावी. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ८२७५६६७०९० यावर संफ साधावा, असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.