You are currently viewing दिव्य ज्योती प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

दिव्य ज्योती प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

दिव्य ज्योती प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा*

तुमच्या संघासाठी तुमचे 100% द्या. ख्रिस्टन रॉड्रिक्स*

सावंतवाडी

विद्यार्थी जीवनात अभ्यासासोबत खेळही तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनो,भरपूर खेळा व आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवा.तुम्हाला जर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल गाठायची असेल तर लहानपणापासूनच खेळ खेळा.तुमची चिकाटी,सातत्य,प्रयत्न, जिद्द कायम ठेवा.संघामधून खेळत असाल तर हार जीत याचा विचार न करता तुमच्या संघासाठी तुमचे 100% पणाला लावा.’ असे विचार यावेळी ख्रिस्टन रोड्रीग्स त्यांनी बोलताना व्यक्त केले. प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गुरुवार व शुक्रवार दिनांक 21 व 22 नोव्हेंबर रोजी दिव्य ज्योती स्कूल डेगवे येथे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांतील विजेते तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स चे कोच ख्रिस्टन रोड्रीग्स,कुडाळ येथील हेड सर्जन डॉ. प्रमोद वालावलकर, फुटबॉल असोसिएशन क्लबचे हेड जयंतराव चामणकर,प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन तसेच मॅनेजर फादर लीजो आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रार्थना नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या गटानुसार संचलन सादर केले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व क्रीडा मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी लांब उडी,उंच उडी,थाळीफेक,भालाफेक,गोळा फेक अशा वैयक्तिक खेळांत त्याचप्रमाणे हॉलीबॉल,क्रिकेट,कबड्डी,फुटबॉल,रस्सी खेच,पासिंग द बॉल असे अनेक सांघिक खेळांत आपले कौशल्य दाखवले.
त्याचप्रमाणे संगीत खुर्ची,बमबार्डींग द सिटी,ट्रेजर हंट यांसारखे गमतीशीर खेळही घेण्यात आले.
या क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी कु.मृदुला सावंत तर आभार प्रदर्शन कु.श्रेया दळवी यांनी केले.दिव्य ज्योती प्रशालीचा दोन दिवशीय वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले योगदान दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा