You are currently viewing काँग्रेसचे बांदा शहर अध्यक्ष राजेश गोवेकर यांचा राजीनामा…

काँग्रेसचे बांदा शहर अध्यक्ष राजेश गोवेकर यांचा राजीनामा…

काँग्रेसचे बांदा शहर अध्यक्ष राजेश गोवेकर यांचा राजीनामा…

*बांदा*

काँग्रेसचे बांदा शहर अध्यक्ष राजेश गोवेकर यांनी पक्षासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे आपण काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
श्री गोवेकर हे गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. गेले काही वर्षे ते शहर अध्यक्ष म्हणून काम करत होते. पक्षाची संघटना नसतानाही त्यांनी याठिकाणी पक्ष वाढीसाठी काम केले होते. मात्र पक्षासाठी वेळ देता येत नसल्याने आपण स्वखुशीने पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा