*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम लेख*
*मी…*
मी कोण आहे…? मी तर एक सावित्रीची लेक आहे. मी आणि मीच फक्त माझ्यासाठी नसून, सर्वांच्या हितासाठी निस्वार्थी भावनेने सदैव तत्परतेने कार्यरत रहावे हेच माझ्या जन्माचे सार्थक. आज आपण सर्व भगिनी मिळून त्रिवार वंदन करूया.निर्भीड आणि शूरपणे समाजातील बंधनांविरूद्ध लढणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना. कारण यांच्या बलिदानामुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री कार्यरत आहे. आणि ती आपले कार्य करीत असतांना स्वतःच्या हिमतीने, स्वकष्टाने अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करीत आहे.
प्रत्येक जण हा आपल्या जीवनाच्या वाटचालीत खूप काही कष्ट सहन करून आपले ध्येय प्राप्त करीत असतो. आणि ठरलेले योग्य ध्येय साधल्यावर सुखी समाधानी होतो. परंतु आपल्या मनासारखे भेटल्यानंतर पूर्वी सहन केलेले कष्ट कधीही विसरता कामा नये.
कारण जीवनाच्या त्या खडतर मार्गावर चालूनच आपण आज आनंदाने जगत असतो.
*मी पणा आणि अहंकार* हे प्रत्येकाचे खूप मोठे शत्रू आहेत.
प्रत्येकाने सर्वांशी आपलेपणाने नम्रतेने वागावे. आयुष्यात कितीही उच्च पदावर पोहोचले तरीही सर्वांसोबत आपुलकीने रहावे. “मी आहे तर सर्व गोष्टी आहे, मीच हे केले, माझ्यामुळेच झाले, मी आणि फक्त मी….” या सर्व बाबी नेहमीच मनुष्याला अधोगतीकडे नेत असतात. त्यामुळे अशा गर्वगर्भित करणाऱ्या गोष्टींपासून व अशा व्यक्तींपासून नेहमी चार हात लांबच रहावे.
*साधी राहणी व उच्च विचार सरणी* असणारे व्यक्तीमत्व कधीही सर्वांचे लाडके असते.
आपल्या जीवनात आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीला आपले आदर्श मानून त्याच्या सारखेच वागण्याचा प्रयत्न करतो. पुढे चालून आपलाही आदर्श कोणी घेईल…! म्हणून मनुष्याने नेहमीच प्रेमळ भावनेने, नम्रतेने वागून सर्वांशी नातेसंबंध टिकवावे..। 🙏🏻
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.: 9420095259*