*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आरती मनाची अंतर्मनाला*
आरती गातो (गाते ) मी समृद्ध होण्या
सामर्थ्यशाली मम अंतर्मना
अंतरबाह्य गोंधळ थांबावा कसा
जय देव जय देव जय अंतर्मना ||धृ °||
आरती गातो मी………
अगाध अशक्य अगम्य ज्ञाना
तेही शक्य तू करिशी सुगम्य
चिंतेवीण चिंतन जे करी ज्ञाना
त्याशी सत्य तू दावी सुगम्य ||१||
जय देव जय देव….
आरती गातो मी………
दिव्य ज्ञान तूचि दिले श्रीकृष्णा
तैसे श्रीरामा अमर त्वा केले
सोपान मुक्ताई निवृत्ती ज्ञाना
सत्चिंतनी ते अमर त्वा केले ||२||
जय देव जय देव….
आरती गातो मी………
अर्जुन दुर्योधन दोघा ठायी तू
दुर्जन सज्जना सर्वा ठायी तू
असोनी एक अनंत रुपी तू
विविधता रम्य बहु रुपी तू ||३||
जय देव जय देव….
आरती गातो मी………
देखल्या ठाया सवके जे मन
त्यासी आवरण्या दे मज ज्ञान
चित्ती अभ्यास अविनाशी ध्यान
सकल सिद्धिचे हेचि दे ज्ञान ||४||
जय देव जय देव….
आरती गातो मी………
सुमन वरद
निराशा ताडण
करिन नमन
मनन चिंतन ||५||
विद्या अंतर्मन
ज्ञान अंतर्मन
विश्वाचे कारण
जाणी अंतर्मन ||६||
देव अंतर्मन
पूजा अंतर्मन
कृती अंतर्मन
निर्मिती कारण ||७||
जय जय अंतर्मनाचिये कारणे
रचिले सकल ज्ञान उपाये
सिद्धी प्राप्त विद्या धन कारणे
पुजिले अंतर्मन या उपाये ||८||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,
जि.- सिंधुदुर्ग, राज्य – महाराष्ट्र.