*साहित्य सम्राट पुणे आणि करिअर सिद्धी हॉबी होम हडपसर यांचा संयुक्त उपक्रम*
पुणे :
साहित्य सम्राट पुणे आणि करिअर सिद्धी हॉबी होम हडपसर यांच्या संयुक्त विद्यमानाने १९५ वे कवी संमेलन प्राध्यापिका आशादेवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून हास्य कवी बंडा जोशी उपस्थित होते.
साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी ग्रीन एरिया बी बिल्डिंग, शिंदे वस्ती हडपसर येथे आयोजित केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करियर सिद्धीच्या संचालिका माधुरी चिदरवार यांनी केले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन कुमारी श्रेया मराठी आणि मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.
एका पेक्षा एक अशा दर्जेदार मराठी हिंदी गझल कविता आणि गीतांनी सजलेली काव्य मैफिल रसिकांनी अनुभवली. या कवी संमेलनामध्ये सौरभ मराठे, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, छगन वाघचौरे, राहुल जाधव, प्रल्हाद शिंदे, आशादेवी, दिपाली सहा, सविता गोकुळे, कल्याण इंदलकर, बंडा जोशी, पंडित मधुर, उद्धव महाजन, बाबासाहेब जाधव, राहुल भोसले, आनंद महाजन, गायत्री मराठी, श्रेया मराठी, माधुरी चिदरवार , संदीप चिदरवार इत्यादी कवी कवयित्री यांनी आपल्या दर्जेदार काव्यरचना सादर करून काव्य रसिकांची संध्याकाळ अविस्मरणीय केली. रसिकांनी अशी कवी संमेलने पुन्हा पुन्हा घेण्याची मागणी केली.
कवी संमेलनाचे नाविन्यपूर्ण सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर उत्कृष्ट आभार आनंद महाजन सरांनी व्यक्त केले.