मंत्री दीपक भाई केसरकर यांचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून अभिनंदन
सर्वप्रथम आता आमच्या हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावावा- रवी जाधव
सावंतवाडी
काल रात्री दोन वाजताची घटना पेशंटच्या नातेवाईकांचा रवी जाधव ला फोन आला कलमबिस्त येथील 18 वर्ष युवकाच्या पोटात खूप दुखू लागल्याने सदर युवकाला काल रात्री नऊ वाजता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले निदानात अपेंडीस असल्याचे डॉक्टरने सांगितले तर थोडं क्रिटिकल असल्याने सदर रुग्णाला लगेच गोवा बांबुळी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.
अशावेळी 108 ला कॉल केला असता ॲम्बुलन्स उपलब्ध होणार नाही असे 108 रुग्णवाहिका सिस्टीम कडून स्पष्ट सांगण्यात आले. हाच प्रसंग परवा रात्री अकरा वाजता घडला. अशाच सिरीयस पेशंटसाठी रवी जाधव यांनी 108 ला कॉल केला असता सारखंच उत्तर मिळालं. अशावेळी कौतुक करायचे ते अधीक्षक डॉक्टर चौगुले यांचे कारण त्यांनी सतर्कता दाखवून सदर दोन्ही पेशंटसाठी हॉस्पिटलची विनामूल्य ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली त्यानंतर तीन तासाने रात्री दोन वाजता पेशंटला गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले व लगेच सदर रुग्णाला ऑपरेशन साठी ओटी मध्ये घेण्यात आले.डॉक्टर चौगुले यांनी सतर्कता दाखवल्यामुळे सदर रुग्णावरील धोका टाळला अशी ही गंभीर परिस्थिती आहे.
मल्टिप्लेक्स हॉस्पिटलचे काम कधी पण सुरू करावे परंतु सध्या स्थितीमध्ये सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दीपक भाई केसरकर यांनी तत्काळ दोन तरी परमनंट जनरल सर्जन डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत कारण गोरगरीब रुग्णांना वारंवार गोवा बांबुळी येथे जावं लागतं.
एखाद्या वेळी इमर्जन्सीला 108 रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यास रुग्णांचे खूप हाल होतात तर काही वेळा अपघात प्रसंगी एखादा रुग्ण गोवा बांबुळी येथे वेळेत न पोचल्यास त्याला जीव गमवावा लागतो.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, रवी जाधव ,रूपा मुद्राळे, समीरा खलील, हेलन निबरे, संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर श्यामराव हळदणकर, शेखर सुभेदार व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर तसेच माजी आमदार कै.जयानंद मठकर यांची सून सीमा मठकर यांच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी हॉस्पिटलला शक्य होईल तेवढ्या सोयी सुविधा पुरवण्याचे काम सातत्याने या संस्थेनमार्फत होत असतं.
एवढेच नव्हे तर सदर संस्थेचे रवी जाधव व राजू मसुरकर हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी सकाळ व संध्याकाळ दररोज फेऱ्या मारत असतात त्यावेळी प्रत्येक रुग्णांचा व तेथील परिस्थितीचा अनुभव त्यांना नेहमीच येत असतो.
म्हणूनच या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दीपक भाई केसरकर यांना कळकळीची विनंती करण्यात येत आहे की सर्व प्रथम रुग्णालयात दोन सर्जन डॉक्टर, स्टाफ व नेहमीच कमी होत असणारा औषधांचा पुरवठा हे गंभीर प्रश्न लवकरात लवकर सोडवून रुग्णांना व हॉस्पिटल हे मंदिर समजून आपला महत्त्वाचा वेळ व विनामूल्य सेवा देणाऱ्या सदर सेवाभावी संस्थेंना सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.