You are currently viewing एनएसीएच सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

एनएसीएच सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

एनएसीएच सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 पोस्ट ऑफिस  भारतीय पोस्टल पेमेंट बँक” (IPPB) च्या  माध्यमातून अत्‍याधुनिक ऑनलाईन सेवा खेडोपाडी देत असून आरडी, पीपीएफ, एसएसए, एईपीएस, पीएलआय/आरपीएलआय, आधार ई. सेवांसोबतच आता नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (e NACH) सुविधेस सुरवात झाली आहे. तरी या सर्वसेवांचा IPPB च्या ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विभाग डाकघर अधीक्षक मयुरेश कोले यांनी केले आहे.

देशामधील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिश्र भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त हित जोपासण्याचा प्रयत्व करत आहे. या सेवा देत असतानाच आता पोस्ट ऑफिस “Indian Postal Payment Bank” (IPPB) च्या माध्यमातून अत्याधुनिक ऑनलाईन सेवा खेडोपाडी देत असून, RD, PPF, SSA, AEPS, PLI/RPLI, AADHAR ई. सेवांसोबतन आता National Automated Clearing House म्हणजेच eNACH सुविधा सर्व ग्राहकांना देण्यास कटिबद्ध झालेले आहे.

ही सेवा आधार OTP वर अवलंबून असून पूर्णपणे सुरक्षित आहे. या नवीन ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून IPPB च्या सर्व ग्राहकांना आता टेलीफोन बिल, लाईट बिल, पाणी बिल, लोन, mutual funds गुंतवणूक या सेवा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.अधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधण्याचे आवाहन सिंधुदुर्ग विभाग डाकघर अधीक्षक मयुरेश कोले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा