You are currently viewing तुम्ही भट म्हटले…..

तुम्ही भट म्हटले…..

तुम्ही भट म्हटले
तो हटला नाही,
तुम्ही टरबुज म्हटले
तो फुटला नाही,
तुम्ही गाजर म्हटले
त्याने जागर सोडला नाही,
तुम्ही बायको काढली
तो खचला नाही,
तुम्ही फसवणीस म्हटले
त्याने कुणाला फसवले नाही,
तुम्ही शिष्ट म्हटले
तो भ्रष्ट झाला नाही,
तुम्ही अभ्यासू म्हटले
तो नापास झाला नाही,
तुम्ही शिरजोर म्हटले
तो लाचार झाला नाही,
तुम्ही पेशवे म्हटले त्याने
छत्रपतींशी इमान सोडले नाही,
तुम्ही नाकाम म्हटले
त्याने आपले काम सोडले नाही,
तुम्ही घरात बसा म्हणाले
तो घरात बसला नाही,
तुम्ही कोरोनाला घाबरले
तो कोरोनाला गवसणी घालून आला,
तुम्ही अवगुणांची बेरीज जमवली
तो गुणांत अव्वल ठरला,
तुम्ही त्याला शेतीतलं काय कळतं म्हणालात
त्याने मातीशी इमान सोडलं नाही,
तुम्ही त्याला सत्तेवर बसू दिले नाही
लोकांनी त्याला हृदय सिंहासनावर बसवले,
तुम्ही वाघाला बकरी बनवलं
तो अनभिषिक्त वनराज ठरला….
*संग्रह@अजित नाडकर्णी,शुभांजीत सृष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा