You are currently viewing दोडामार्ग पोलिसांची कारवाईत विजघर चेकपोस्टवर दारुसह ८ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

दोडामार्ग पोलिसांची कारवाईत विजघर चेकपोस्टवर दारुसह ८ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

दोडामार्ग पोलिसांची कारवाईत विजघर चेकपोस्टवर दारुसह ८ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

दोडामार्ग

दोडामार्ग – बेळगाव मार्गावर वीजघर पोलीस चेक पोस्टवर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात दोडामार्ग पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ८ लाख रुपये किमतीचा कॅन्टर व १० हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारू असा एकूण ८ लाख १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी विनोद धर्माप्पा दोडमणी (३५, रा. शिरूर, बागलकोट कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीजघर चेकपोस्टवर पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. गोव्यातून बेळगावच्या दिशेने येणारा कॅन्टर (केए ६३ – ७६३८) तपासणीसाठी थांबविण्यात आला. कॅन्टरच्या मागील हौद्यात तीन कागदी पुठ्ठयाचे दारूचे बॉक्स आढळून आलेत. चालकाकडे गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीचा परवाना नसल्याने सदर दारू व दारू वाहतुकीसाठी वापरलेला कॅन्टर पोलिसांनी जप्त केला. दारूची किंमत बाजारभावाप्रमाणे १० हजार ८०० रुपये आहे.

सदर कारवाई पोलीस नाईक राजेश गवस, सर्वेक्षण स्थिर पथक प्रमुख रवींद्र चव्हाण पाणीपुरवठा विभागाचे दशरथ शिंदे, होमगार्ड अनिकेत गवस, कॅमेरामन आकाश वाघेला यांच्या पथकाने केली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा